परवाच पांच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये निकाल घोषित होतील. ही २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम असेल. जनमत कोणत्या बाजूला आहे याची कल्पना येईल. म्हणून या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे महत्व आहे. तसेच मोदी यांचा कस लागणार आहे. काँग्रेस की भाजपा याचा अंदाज येऊ शकेल. म्हणून या पांच राज्यातील निवडणुका महत्वाच्या आहेत. येत्या डिसेंबर मध्ये चित्र स्पष्ट होईलच.
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३
निवडणूक २०१४
निवडणूक २०१४ जवळ येत आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यापैकी भा.ज.पा. सर्वात पुढे असल्याचे दिसून येते. त्या पक्षाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांची घोषणा करून आघाडी घेतली आहे. आता यापुढे सर्व पक्षांची हालचाल सुरु होईल. परंतु जनता अशा पक्षामागे जाईल, जो महागाई, भ्रष्टाचार, बलात्कार , दहशतवाद इ. विषयांना पायबंद घालील. हे सर्व करण्यासाठी सध्या मोदी लोकांसमोर आहेत. असे असलेतरी २०१४ ची निवडणूकच ठरवेल कोण सत्तेवर येणार. तसेच कोण जनतेची अपेक्षा पूर्ण करणार?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)